हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग हि जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग बनली आहे.ही टी -२० लीग भारतात २००८ मध्ये सुरू झाली होती. त्याआधीच एका वर्षापूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टी -२० विश्वचषक जिंकला होता.यानंतरच आयपीएल सुरू झाले आणि आतापर्यंत त्याचे १२ सीझन खेळले गेले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग १८ एप्रिल २००८ रोजी सुरू झाली. या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. इन्स्टंट क्रिकेटच्या या लीगच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने केकेआरसाठी स्फोटक डाव खेळला होता, जो एक इतिहास बनला आहे.
मॅक्युलमने लीगच्या या पहिल्या सामन्यातच १५८ धावांचा धमाकेदार डाव खेळला. आपल्या जोरदार फलंदाजीदरम्यान मॅक्युलमने १३ गगनचुंबी षटकार आणि १० चौकार लगावले.
मॅक्युलमच्या शतकामुळे केकेआरने निर्धारित २० षटकांत तीन गडी गमावून २२२ धावांची विशाल धावसंख्या उभी केली.याला उत्तर देताना आरसीबीच्या टीमची अवस्था खराब झाली आणि फक्त ८३ धावा करुन ऑलआऊट झाली.अशाप्रकारे, केकेआरने १४० धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकून IPL मधील आपली वाटचाल सुरु केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.