हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिलच्या जोरदार उष्णतेमध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शानदार ऐतिहासिक शतक झळकावले होते.२२ एप्रिल १९९८ रोजी शारजाह क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला होता.कोका-कोला चषकातील या सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३१ चेंडूचा सामना करत १४३ धावा काढल्या होत्या,परंतु असे असूनही या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, डॅमियन फ्लेमिंग आणि मायकेल कॅसप्रोव्हिच यांसारख्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करणे सोपे नव्हते परंतु तरीही शतकी खेळी करत ९ चौकार आणि ५ शानदार षटकार ठोकले.म्हणूनच हे शतक त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खास शतक मानले जाते.सचिनच्या या खेळीमुळे भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला.
खरं तर, भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय या १९९८ च्या या कोका कोला कप मध्ये तिसरा संघ म्हणून न्यूझीलंडही होता आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताने हा सामना जिंकायला हवा होता किंवा रन रेटच्या बळावर किवी संघाच्या पुढे राहावे लागणार होते.
या स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ७ गडी गमावून २८४ धावा केल्या. मात्र, त्यानंतर भारताला ४६ षटकांत २७७ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी हे एक कठीण आव्हान होते आणि दुसरीकडे सचिन खंबीर हेतूने भारताला जिंकून देण्यासाठी मैदानावर आला होता.
सचिन त्यादिवशी थांबणार नव्हता,हा फक्त त्याच्या मनात असलेला भारताचा विजय मात्र मिळू शकला नाही आणि भारतीय संघ ४६ षटकांत २५० धावाच करू शकला.मात्र, तोपर्यंत सचिनने आपले काम चोख बजावले होते. रन रेटच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी भारताला कमीतकमी २३७ धावा कराव्या लागणार होत्या आणि त्या करून भारतीय संघाने अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले.
हा ऐतिहासिक डावाला आठवत सचिन नंतर म्हणाला,”एप्रिल महिन्यात शारजाहमध्ये तापमान खूपच तापदायक असतं.फलंदाजीदरम्यानच मला उष्णता जाणवत होती,मला वाटले की मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊ आणि आपले शूज काढून बर्फाने भरलेल्या बादलीत पाय ठेऊ.”
तो म्हणाला, “माझ्या कारकीर्दीतील हा एक अनुभव आहे कि अशा प्रकारच्या परिस्थितीत जगातील पहिल्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळणे किती कठीण आहे हे तेव्हा मला कळले .”
सचिन म्हणाला, त्या काळात आम्हाला शारजाहमध्ये खेळण्याची सवय होती. मला आठवत आहे की या सामन्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दुबईला अंतिम सामना खेळण्यासाठी रवाना झालो होतो,जे आमच्यासाठी खूप कठीण होते कारण आम्ही खूपच थकलो होतो. ”
यानंतर अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून या मालिकेचे विजेतेपद जिंकले.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
https://youtu.be/aMubYAbRbgc