हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो व्हायरसमुळे,खेळाच्या कार्यक्रमांवर सध्या जगभरात बंदी आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे चाहते आणि सहकारी क्रिकेटपटूंशी संपर्क साधत आहेत. यावेळी अनेक माजी खेळाडू त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना त्याबाबत मोठे खुलासेही करीत आहेत.यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचेही नाव जोडले गेले आहे.पाँटिंगने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या एका षटकाचा त्याच्या कारकिर्दीतील त्याने सामना केलेले सर्वात वेगवान षटक म्हणून उल्लेख केला आहे.
पाँटिंगने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो म्हणाला की, “फ्लिंटॉफने मला केलेल्या सर्वात वेगवान षटकाचा सामना मी केला आहे. त्यानंतर शोएब अख्तरचा नंबर लागतो ज्याच्या सर्वात वेगवान षटकाचा सामना केला.” पाँटिंगने आपल्या या ट्विटमध्ये जस्टिन लँगरचाही उल्लेखकेला आहे.
Got plenty of questions the other day after calling the Flintoff over the best I’d faced.
This from @shoaib100mph was the fastest spell I’d ever faced and trust me Justin wasn’t backing up too far at the other end. pic.twitter.com/JhhuEwXrAc
— Ricky Ponting AO (@RickyPonting) April 15, 2020
इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या अॅशेस कसोटी सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफचे जादुई षटक ‘बेस्ट ओव्हर’ असल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते. त्या सामन्यात इंग्लंडचा दोन धावांनी थरारक विजय झाला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.