हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने चार दिवसांच्या कसोटी सामन्यावरील सूचनेला नकार दिला आहे.तो म्हणाला की या खेळाचे हे प्रारूप कमी केल्यास त्याचा अपेक्षित निकाल लागण्याची शक्यताही कमी होईल.
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रम क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मण म्हणाला की, “मी चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यास कसलीही पसंती देत नाही. पाच दिवस या स्वरूपामध्ये योग्य बसतात कारण निकाल लागायचे चान्सेस जास्त असतात.सामना चार दिवसंच केल्यास निकाल लागण्याचे प्रमाण खाली येईल जे खेळासाठी खूप हानिकारक असेल.”
लक्ष्मण पुढे म्हणाला की, “याशिवाय यासंदर्भात आणखी एक बाजू अशी आहे आणि ती म्हणजे नाणेफेक, विशेषकरुन परदेश दौर्यावर येणाऱ्या संघाचा कर्णधार याला त्याला काय करायचे आहे याचा निर्णय घेण्याची संधी मिळते, कारण आम्हाला हे हवे आहे कि जो संघ दौरा करीत असतो परदेशी भूमीवर सामने जिंकावे आणि तसे झाल्यास चाहत्यांसाठी हा खेळ अधिकच मनोरंजक बनतो. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.