‘८०० बळी न घेता मुरलीधरनला निवृत्ती देण्याची इच्छा नव्हती’ – संगकारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने मुथय्या मुरलीधरन बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. संगकारा म्हणाला की,’ मुरलीधरनला २०१० च्या भारताविरुद्धच्या कसोटीनंतर निवृत्ती घ्यायची इच्छा होती पण मुरलीधरनने ८०० बळी न घेता कसोटी कारकीर्द संपवावी अशी संगकाराची इच्छा नव्हती.

जुलै २०१० मध्ये भारताविरुद्ध आपली शेवटची कसोटी सुरू होण्यापूर्वी संगकाराने मुरलीधरनशी केलेली चर्चा आठवली. संगकाराने सांगितले की ‘ त्यावेळी मुरली ७९२ विकेट्सवर होता. मात्र तो म्हणाला की,’ भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मला खेळायची इच्छा नाही.’

संगकाराने खुलासा केला की, त्याने आणि निवडकर्त्यांनी मुरलीधरनला आणखी दोन सामने खेळण्याची ऑफर दिली होती. पण या अनुभवी ऑफ स्पिनरने त्याला नकार दिला. नंतर मुरलीधरन म्हणाला की, तो गॅले कसोटीतच ८०० बळी पूर्ण करेल आणि संघाला या सामन्याच्या विजयाने मालिकेची सुरूवाट करण्यास मदत करेल.’

मुरलीधरनने आपला शब्द पाळला. त्याने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेत १० गडी राखून हा सामना श्रीलंकेला जिंकून दिला. मुरलीधरननेही त्यावेळी आपला ८०० बळींचा टप्पादेखील पार केला.

“८०० बळी मिळवण्यापासून तो केवळ ८ बळी दूर होता. मुरली म्हणाला की,’ भारताविरुद्धच्या मालिकेतच मला निवृत्ती घ्यायची आहे. त्यावेळी मी कर्णधार होतो.” संगकाराने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आर अश्विनशी संवाद साधताना सांगितले,’ मी निवडकर्त्यांबरोबर मीटिंग घेतली आणि म्हणालो,” पहिल्या कसोटीनंतर त्याला निवृत्ती घ्यायची आहे. मात्र हे होणार नाही. त्याने ८०० विकेट घेतल्यानंतरच त्याने निवृत्त होण्याचे सर्वांनी मान्य केले. त्यामुळे आम्ही मुरलीला मीटिंगमध्ये बोलाविले. “

संगकाराने पुढे सांगितले, “मी त्याला म्हणालो की ,’मुरली, आम्हांला माहिती आहे कि तुला आव्हानांची आवड आहे. पण जरा याचा विचार कर. जर तू जवळ गेलास आणि तुला ८०० बळी मिळू शकले नाहीत तर ते फार वाईट असेल. तू पुढील कसोटी खेळू शकतोस. नंतर जर तुला थकवा जाणवत असेल तर दुसर्‍या कसोटीत विश्रांती घेतल्यानंतर तू तिसर्‍या कसोटीसाठी परत संघात येऊ शकतोस किंवा आपण हे २ कसोटी सामने वगळू आणि पुढील मालिकेत तू परत येऊ शकतोस. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.