बीसीसीआयवर भडकला युवराज सिंग, म्हणाला की …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देण्याचा मोलाचा वाटा उचलणारा भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आता बीसीसीआयवर भडकल्याचे पाहायाल मिळत आहे. बीसीसीआयने काही खेळाडूंचा सन्मान केला नाही, असे युवराज म्हणत आहे.

युवराजने भारताला बरेच विजय मिळवून दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकात तर युवराज हा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. युवराजने २००७ साली झालेल्या पहिल्याच ट्वेन्टी-२० विश्वचषकात युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात तब्बल सहा षटकार लगावले होते. त्यानंतर युवराजचे नाव सिक्सर किंग, असे पडले होते. आतापर्यंत युवराजने बऱ्याच सामन्यांमध्ये चमक दाखवलेली होती. पण आता मात्र तो बीसीसीआयवर नाराज झालेला पाहायला मिळत आहे.

युवराजने बीसीसीआयवरील नाराजी व्यक्त करत असताना आपले म्हणणेही मांडले आहे. युवराज म्हणाला की, ” ज्या क्रिकेटपटूंनी देशाची सेवा केली, त्यामधील काहींबरोबर बीसीसीआयने चांगली वर्तणूक दाखवली नाही. त्यांचा सन्मान केला नाही. जेव्हा खेळाडू अडचणीत सापडलेला असतो तेव्हा क्रिकेट मंडळाने त्यांची मदत करायची, असते. पण तसे बीसीसीआयकडून घडलेले पाहायला मिळत नाही.”

युवराज पुढे म्हणाला की, ” भारताला वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारखे महान क्रिकेटपटू मिळाले. पण या खेळाडूंना आपला अखेरचा सामनाही खेळता आला नाही. माझ्याबाबतीतही बीसीसीआयने असेच केले . बीसीसीआयचे हे अव्यावसायिक धोरण आहे. आतापर्यंत आम्ही खेळाडूंनी देशाची सेवा केली. देशाच्या विजयात बऱ्याचदा मोलाचा वाटाही उचलला. पण आम्हा खेळाडूंना अखेरचा सामनाही खेळू देऊ नये, ही गोष्ट फार वाईट आहे.”

Leave a Comment