जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने पर्यवेक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
बोदवड जवळील नाडगाव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका चंदा गरकळ यांच्यावर के ई पाटील या शिक्षकाने चाकू हल्ला केला . एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे .आज सकाळी शिक्षिकेवर झालेला चाकू हल्ला हा एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा सर्व प्रकार संबंधीत शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जखमी पर्यवेक्षिका केच्या पतीकडून दिलेल्या माहितीनुसार चंदा उमेश गरकळ ( वय ३२ ) या बोदवड (नाडगाव) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीड वर्षांपासून नोकरीला आहेत. त्याच महाविद्यालयात के.ई पाटील हा शिक्षकदेखील कामाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून के ई पाटील हा शिक्षक चंदा गरकळ यांना व्हाटसअॅप आणि फेसबुकवर अश्लील मॅसेज पाठवत होता. मात्र त्यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद न देता महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. तथापि, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
दरम्यान, आज बोदवड येथे येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस उशिरा आल्याने आयटीआयमधील कर्मचारी उशिरा आले. ही संधी साधत चंदा गडकळ यांना एकटे पाहून के. ई. पाटील यांनी एका वर्गाचा दरवाजा बंद करत त्यांनी धारदार शस्त्राने पोटावर तोंडावर हातावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.