उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी – मायावती

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

#hyderabad: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या; फुलांचा वर्षाव अन फटाके वाजवत जल्लोष

या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे.

तीला १०दिवसांत न्याय मिळाल्याचा आनंद; निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

शुक्रवारी पहाटे हैद्राबाद प्रकरणातील आरोपीना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला

Breaking | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद | हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा … Read more

सातारा कारागृहात धारदार कटर आणि चिठ्ठी आढळली, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञाताकडून चायनीज धारदार कटरआणि चिठ्ठी टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं कारागृह सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठाण्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोवर जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

लोणावळा तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित ९ जणांच्या फोटोवर जादूटोणा, भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जादूटोणा करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जमीनीची खरेदी विक्री करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती तसेच तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोकाच्या एका झाडाला ९ जंणाचे फोटो खिळ्याने ठोकून त्यावर लिंबु, काळ्या बाहुल्या, बिबा, टाचण्या लावून भानामती सारखा अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिकने केला तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.

सातारा पोलीस माजी सैनिकांच्या मदतीला, सैनिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी घेणार पुढाकार

सातारा जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक गावातील व्यक्ती ही भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असल्याचे सर्वांना माहित आहे. मात्र देशाचे कर्तव्य आणि जबाबदारी बजावत असताना त्यांना देखील कुटुंबासहित इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामध्ये त्यांना देखील बऱ्याच अडचणी येत असतात. त्यांच्या ह्या अडचणी जाणून घेण्यासाठी सातारा पोलिसांनी आता पुढाकार घेतला आहे.