नक्षल्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

अबुझमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नक्षलवादी प्रशिक्षण तळ उध्दवस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले होते. यावेळी मोठया प्रमाणावर नक्षल साहित्य तसेच दस्तऐवज हस्तगत करण्यात आले होते. मिळालेल्या दस्तऐवजावरुन काल गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाच्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. या रस्त्यावर नक्षलवादयांनी घातपाताच्या दृष्टीने पुरुन ठेवलेले अंदाजे १५ कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन मिळुन आले.

महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे; महिलांना शस्र परवाना देण्याची मागणी

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.  

मारूंजी परिसरात आढळला तरूणाचा मृतदेह

मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भोसरीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; तीनजण गंभीर जखमी

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वनवाडीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ZERO FIR म्हणजे नक्की काय ? प्रत्येक सामान्य नागरिकाला हे माहित असणं आवश्यक आहे

सामान्य नागरिक जेव्हा एखाद्या वाईट संकटाचा बळी ठरतो , आणि मग जेव्हा पोलिसांची मदत घेऊ पाहतो . तेव्हा बऱ्याच वेळा त्याला तक्रार कुठे दाखल करायची हेच समजू शकत नाही . घटना घडली तो परिसर ज्या हद्दीत येतो त्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी कि आपण राहतो या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी … तर बराच जणांना आपण कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो हे देखील नक्की माहित नसते . अशा अनेक विवंचनेत आणि गुन्हा दाखल करण्याच्या धडपडीत अनेक जण हताश होतात . म्हणूनच काय आहे ZERO FIR हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे .

बंद फ्लॅटमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

मूळ बीडची असलेली ३० वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आढळला. तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.