शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मअसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आल्यामुळं माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतच एकुण ३१ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या एकुण सहा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. माओवाद्यांनी ना. पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र मा. महादेव तांबडे, मा. पोलीस अधीक्षक गडविरोली श्री शैलेश बल्कवडे सा. यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यामध्ये १ पुरुष आणि पाच महिला माओवादयांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक गडविरोली शैलेश बल्कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये संदीप उर्फ महारू चमरू वड्डे, मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनराव कुरचमामी, स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला, अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी, ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो आणि तुलसी उर्फ मारे सन्नू कोटामी यांचा समावेश आहे.