वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात, १९ प्रवासी जखमी

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्याने चौघांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.    

कराडात पुन्हा गोळीबार, १२ राऊंड फायर करुन युवकाची हत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडातील पवन सोलवंडे खून प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विकी लाखे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव असून या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रात्री १० च्या सुमारास आगाशिवनगर परिसरात जॅकवेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा … Read more

लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा, मुलींचे अश्लिल चित्रिकरण

पुणे प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड येथील एका हाॅटेलमध्ये मुलींचे अश्लिल चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू हाॅटेल मधील वाॅशरुममध्ये छुपा कॅमेरा लावून मुलींचे अश्लिल व्हिडिओ शुट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हाॅटेलमालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर कर्मचार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू … Read more

ISIS म्होरक्या बगदादी कुत्र्यासारखा ठार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य‍ांनी अमेरीकेच्या सैन्याने आयसीसचा म्होरक्या बगदादी याला ठार केल्याची घोषणा केली आहे. तो भेकड होता आणि आज तो कुत्र्यासारखा मारला गेला असं म्हणत ट्रम्प यांनी बगदादीच्या घात्म्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याची … Read more

हनीट्रेपमध्ये अडकला होता आमदारकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचा मुलगा, पुढे काय झालं पहा

औरंगाबाद प्रतिनिधी | मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या श्रीमंतांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्यासोबत शारीरीकसंबंधांचे चोरून व्हिडीआहे क्लीप तयार करून त्या क्लीप द्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पुुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. विश्वनाथ माळी (२२ रा. सिडको, एन-६), आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आरोपी हा तरूण … Read more

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

उमेदवार बसपाचा, काम केलं राष्ट्रवादीचं; शिक्षा म्हणून बारामतीमध्ये काढली धिंड

अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती.

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

महाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का ? – राजू शेट्टी

स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना काल समोर आली होती. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.