‘ई-सिगारेट’चा वापर केल्यास सहा महिन्यांपर्यंत कैद – केंद्र सरकार

इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) प्रतिबंध कायद्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला असून ई-सिगारेट बाळगल्यास किंवा वापर केल्यास सहा महिन्यांपर्यंत कैद आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा यामध्ये प्रस्तावित केली आहे. हा मसुदा सरकारने हरकती आणि सूचनांसाठी शुक्रवारी खुला केला आहे. केंद्र सरकारने १८ सप्टेंबर रोजी ई-सिगारेटवर अध्यादेश काढून बंदी आणली. त्यानंतर आता ई-सिगारेट प्रतिबंध कायदा प्रस्तावित करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीचा मसुदा तयार केला असून केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

संपत्तीच्या वादातून मुलीनेच केला बापाचा खून

संपत्तीच्या वादातून मुलीनेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. बाबुराव कंकाल असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रेश्मा बाविस्कर असे मृत बाबुराव यांच्या मुलीचे नाव आहे.

वाडा-भिवंडी रोडवर अपघातांचे सत्र सुरूच, दोन दिवसात खड्डयाचा दुसरा बळी

वाडा-भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झालाय. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने ६० वर्षीय पादचाऱ्याला उडवल. कुडूस इथं ही घटना घडली. या नागरिकाला वेळेवर उपचार न मिळाल्यान त्याचा मृत्यू झाला. रामप्रसाद गोस्वामी असं या मृताच नाव असून तो मुसारणे येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक  म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बिहार येथील असून वाडा तालुक्यतील कुडूस येथे राहत होता.

 खाजगी बसचा अपघात, सुदैवाने ३३ प्रवासी बचावले  

मुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बसचा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.  मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धक्कादायक!! जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा केला पीडितेवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर पूर्वी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या नराधमाने जामिनावर सुटून आल्यावर केस का केली? असे म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घडली. सागर सुनील श्रीसुंदर (रा शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. या नराधमावर याआधी सदर पीडित अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून बलात्कार केल्याचा छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हिंगोलीत मुजोर कंत्राटदाराकडून मजुरांवर गोळीबार, दोन जखमी

हिंगोली इथं सुरू असलेल्या महामार्गाच्या कंत्राटदाराने मजुरांवर गोळीबार केल्याची घटना कनेरगाव नाका परिसरात घडली. पैशाच्या कारणावरून वाद घालीत कंत्राटदाराने आपल्याकडील पिस्तुलने मजुरांवर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संजय कुमार व हरिराम निषाद हे दोन मजूर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी हिंगोली इथं हलविण्यात आल आहे.

घोडबंदर रस्त्यावर भीषण अपघात; मायलेकी जागीच ठार

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.

लाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागान त्याला रंगेहाथ पकडलं. ही कारवाई बुधवारी सायंकाळी शेगाव इथं करण्यात आली. या कारवाईन दुय्य्म निबंधक कार्यालयाचे धाबे दणाणले आहे.

धक्कादायक !! गडचिरोलीत काँग्रेसच्या नेत्याकडून अपक्ष उमेदवाराचे अपहरण

यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर दहा जणांवर ३६५ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात भीषण अपघात, ३ तरुण जागीच ठार

संगमनेर शहराजवळील पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय-२९) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८) रा. दरेवाडी, अजय श्रीधर पेदाम (वय-२७) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर यांचा मृत्यू झाला.