तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, महिला पोलीसाचा विनयभंग केल्याचा आरोप

भंडारा प्रतिनिधी। तुमसर पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंग प्रकरणी भाजप आमदाराला अटक करण्यात आलीये. महिला पोलीस उपनिरीक्षक, यांनी 18 सप्टेंबरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन 354 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. आज विद्यमान आमदार चरण … Read more

बंगल्यामध्ये सुरु असणाऱ्या कुंटन खान्यावर छापा

सांगली प्रतिनिधी| स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबिंध कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यावर छापा टाकून त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु असलेला वेश्या अड्डा उध्वस्त केला. या ठिकाणाहून २ महिलांना अटक केली आहे, तर एका पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. सुभाषनगर येथील … Read more

२० वर्षीय युवकाने चोरलेले तब्बल ८ लाख रुपयांचे २१ कॅमेरे

सांगली प्रतिनिधी। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुपवाड रस्त्यावरील ऋत्विक नितीन शिंदे याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपयांचे २१ कॅमेरे जप्त केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहर विभागात पेट्रोलिंग करीत गुन्हेगारांची माहिती काढत होते. त्यावेळी पथकातील … Read more

तुमसर शहरात सराईत गुंडाची निर्घृण हत्या

भंडारा प्रतिनिधी| भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुमसर शहरातील कालीमाता मंदीर जवळ एका सराईत गुंडाची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या झाल्याची थरारक घटना बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान घडली. बाबू बॅनर्जी (३२) रा. जगनाडे नगर, तुमसर असे मृतकाचे नाव आहे. तुमसर शहरात घडलेली ही थरारक घटना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबू बॅनर्जी … Read more

गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे. पोलीस दलाचे सी-60 … Read more

सोलापुरात दोन पोलिसांना लाच घेतांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

सोलापुर प्रतिनिधी। सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित दोघा पोलिसांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष राठोड आणि महेश दराडे अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोन लाचखोर पोलीसांवर 5 हजाराची लाचेची मागणी तसेच 3 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत … Read more

बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडलाय. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष … Read more

सांगलीत तडीपारी आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

सांगली प्रतिनिधी। तडीपारी आदेशाचा भंग करुन कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता शहरात दाखल झालेल्या दोघा तडीपारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. बंड्या दडगे आणि महेश पाटील अशी त्यांची नावे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी तडीपारी आदेशाचा भंग करुन शहरात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे … Read more

मोठ्या भावाचा खून करून केला अपघाताचा बनाव

सांगली प्रतिनिधी। अंबक फाटा सोनहीरा कारखाना चौक येथील बुरुंगले कुटुंबात जागेच्या वाटणीवरून घरगुती वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या सख्या भावास व त्याच्या साथीदारास चिंचणी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रामापूर फाटा जवळ रात्री बाराच्या सुमारास घडला होता. शिवाजी … Read more

आंबा घाट खून प्रकरणामध्ये चार संशयितांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी। आंबा येथील कोंकण दर्शन पिकनिक पॉईंटवर गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या खुनाचा छडा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण ने लावला आहे. दारू पिऊन सतत दशहत, शिविगाळ करणाऱ्या संतोष तडके याचा काटा सख्या भावानेच तिघा साथीदारांच्या साह्याने काढला असल्याची कबुली मुख्य सूत्रधार संशयित संजय शरद शेळगे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी संजय … Read more