हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Crude Oil : कच्च्या तेलाच्या आघाडीवरून बर्याच दिवसांनंतर एक चांगली बातमी येते आहे. आज, गुरुवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या खाली आला आहे. ज्यामुळे गुरुवारी दुपारी कच्च्या तेलाचा भाव 97-98 डॉलर्सच्या दरम्यान गेला. गेल्या 5 महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. याआधी कच्चे तेल 16 मार्च रोजी प्रति बॅरल 98 डॉलर्सपर्यंत खाली आले होते.
याबाबत कमोडिटी मार्केटमधील एक्सपर्टस सांगतात की,”जर क्रूड 97 डॉलर्स किंवा 95 डॉलर्सच्या खाली आले तर ते आणखी खाली येऊ शकतील. तसेच जर क्रूड 100 डॉलर्सच्या खाली आले तर ते आपल्यासाठी मोठा दिलासा देणारे ठरेल. कारण आपल्या आयातीमध्ये कच्च्या तेलाचा (Crude Oil) आणि पेट्रोलियमचा सर्वाधिक वाटा आहे.” तसेच जर क्रूड स्वस्त झाले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.
यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कच्च्या तेलाने 100 डॉलर्सच्या वरची पातळी गाठली आहे. त्यानंतरही ते सतत 100 डॉलर्सच्या वरच्याच पातळी वर होते. यानंतर मात्र जसजसे रशिया-युक्रेन संकट वाढत गेले तसतसे क्रूडचे (Crude Oil) दरही वाढतच गेले. दरम्यान, क्रूडने (Crude Oil) आपली 120 डॉलर्सची सर्वोच्च पातळी गाठली.
इथे हे लक्षात ठेवा कि, भारताच्या एकूण आयातीमध्ये पेट्रोलियम आणि क्रूड उत्पादनांचा वाटा सर्वाधिक आहे. भारत दरवर्षी सुमारे 82 अब्ज डॉलर्स किमतीचे पेट्रोलियम आणि क्रूड उत्पादने आयात करतो. त्यामुळे क्रूडच्ये किंमती स्वस्त झाल्या तर अर्थव्यवस्थेचे आर्थिक आरोग्यही चांगले राहील. तसेचयामुळे देशाची व्यापारी तूटही काही प्रमाणात कमी होईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://oilprice.com/
हे पण वाचा :
Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???
Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल