नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बँक Cashaa ने भारतात बँकिंग ऑपरेशंस सुरू केले आहे. यासाठी एक प्रस्तावही देण्यात आला आहे, यामुळे स्वत: आर्थिक क्षेत्राशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आधीच क्रिप्टोकरन्सीजच्या ट्रेडिंगबाबत नाराजी दर्शविली आहे, त्यानंतरही काही प्रयत्न सुरु आहेत. RBI चे नियम टाळण्यासाठी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा मार्ग काढल्याची योजना आखल्याचे सांगण्यात येत आहे. Cashaa म्हणाले की,” त्याने देशातील फिजिकल ब्रॅन्चमधून क्रिप्टोच्या बिझनेसशी संबंधित Unicas लॉन्च केले आहे. यासाठी युनायटेड मल्टीस्टेट क्रेडिट सहकारी संस्था सोबत पार्टनरशिप केली गेली आहे. त्याचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गौरव म्हणाले की,” या माध्यमातून एक सेविंग्स एकाउंट क्रिप्टो आणि करन्सीसाठी सर्व्हिस देता येईल.
RBI ची परवानगी घेण्याची गरज नाही
यासाठी RBI कडून परवानगी घेण्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की,” ही एक मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटी आहे जे सोसायटीच्या रजिस्ट्रार अंतर्गत रजिस्टर्ड आहे. यामध्ये सर्व्हिस फक्त सदस्यांनाच पुरविल्या जातात आणि यामुळे RBI ची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. बँकिंग क्षेत्राशी संबंधित एका सूत्राने याबद्दल सांगितले की,” त्याचे प्रमोटर्स को- ऑपरेटिव्ह सोसायटी वापरत आहेत जेणेकरुन ते RBI च्या कठोर नियमांपासून वाचू शकतील. RBI कडून बँकिंग लायसन्स मिळणार नाही.”
सरकार कायदा आणण्याचाही विचार करीत आहे
तथापि, ही संस्था आपल्या सदस्यांना कर्ज देऊ शकते. यामुळे आर्थिक व्यवस्थेस धोका निर्माण होऊ शकेल Cashaa ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची आणि क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी त्यांची बचत खाती उघडण्याची योजना आखत आहे. क्रिप्टोकरन्सीस नियमित करण्यासाठी कायदा आणण्याबाबतही सरकार विचार करीत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group