Cryptocurrency : कमी पैशात करा ‘अशा’ प्रकारे गुंतवणूक; हमखास रिटर्न्स मिळतील

Cryptocurrency
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैसापाण्याची गोष्ट । Cryptocurrency क्रिप्टोकरन्सी ही चांगली गुंतवणूक आहे का? हा प्रश्न क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात अनेकदा विचारला जातो. सगळ्यांकडेच गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा नसतो. सुदैवाने क्रिप्टो हे असे गुंतवणुकीचे साधन आहे ज्याचा वापर कुणीही, अगदी मर्यादित पैसे असले तरी करू शकते. पैसा कमावण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे असले पाहिजेत हा समज नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांमधील सर्वसामान्य गैरसमज आहे. वझीरएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक निश्चल शेट्टी यांनी या लेखात कमी पैसा असलेले गुंतवणूदार क्रिप्टोकरन्सीमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतात याची माहिती दिली आहे.

छोट्या प्रमाणात सुरूवात करा : 

शेअर बाजाराप्रमाणेच क्रिप्टो बाजारपेठेत चढउतार होतात. म्हणजेच मालमत्तेच्या किंमतींमध्ये वेगाने बदल होतात. त्यामुळे तुमच्याकडे पुरेशी रोख रक्कम म्हणजे साधारण सहा महिने कर्ज न घेता जगणे शक्य असल्याची खात्री केल्यावरच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा.

कोणती क्रिप्टोकरन्सी घ्यायची याचा निर्णय घ्या :

बाजारात विविध प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. परंतु ट्रेंडवर स्वार होऊन पाच विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे ही कल्पना चांगली नाही. तुम्हाला योग्य क्रिप्टो कॉइनची निवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची गरज आहे. बातम्या पाहत राहा, सर्वोत्तम पाच कामगिरी करणाऱ्या क्रिप्टोकरन्सींची यादी तयार करा आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवा.

सर्वाधिक विश्वासार्ह क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) एक्स्चेंजची निवड करा :

भारतात क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजेसची यादी तपासा. त्यासोबत व्यवहाराचा खर्च, फायदे आणि तोटेही तपासा. या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजची रचना कर्ज देणे, देखभाल करणे आणि कर्जे देणे अशा प्रकारे काम करणाऱ्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांसारखी विशेषतः क्रिप्टोकरन्सी आणि त्यांचे चढउताराचे स्वरूप यांचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेली असते.

क्रिप्टोकरन्सी वॉलेट निवडा : 

एक क्रिप्टोकरन्सी वॉलेट एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे, जे तुमच्या खासगी व सार्वजनिक कीज राखते आणि तुम्हाला ब्लॉकचेनशी जोडते. तेथे तुमच्या क्रिप्टो मालमत्ता साठवलेल्या असतात. दुर्दैवाने अनेक लोक क्रिप्टोकरन्सी वॉलेट आणि क्रिप्टोकरन्सी स्टोअरेज यांच्यात गोंधळ करतात. अर्थात ते तुम्हाला ब्लॉकचेनवर तुमची क्रिप्टोकरन्सी देण्यासाठी की या नावाने संबोधित असलेला क्रिप्टो अ‍ॅड्रेस वापरण्याची परवानगी देतात. (Cryptocurrency) 

रूपया – किंमत सरासरी :

रूपया- किंमत सरासरी हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याला तुमची गुंतवणूक कालाधारित पद्धतीने नियमित वाढवण्यासाठी विशिष्ट रकमेच्या मालमत्ता किंवा मालमत्तांचा पोर्टफोलिओ ताब्यात घेण्याची गरज असते. रूपया किंमत सरासरीमुळे लहान गुंतवणूकदारांना मालमत्ता तर निर्माण करतेच पण त्याचबरोबर व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत सरासरी किंमतीत क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याची संधी देऊन बाजारातील चढउतार सुलभ करण्यास मदत करते.

जास्त परताव्याची बिटकॉइनची क्षमता, किंमतीतील चढउतार आणि त्याची बिटकॉइनच्या एक दशलक्षपर्यंत विभाजित करण्याची शक्यता लक्षात घेता कमी साप्ताहिक किंवा मासिक गुंतवणुकीद्वारे रूपया- खर्च सरासरीद्वारे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. बिटकॉइन आपल्या पूर्वीच्या कामगिरीइतकी उत्तम कामगिरी करू शकेल की नाही याचा अंदाज कोणी लावू शकत नसले तरी अनेक बिटकॉइन तज्ञांच्या मते या डिजिटल करन्सीला वाढण्याच्या अनेक संधी आहेत.

तुम्ही वरील पद्धतींचा वापर केल्यास तुम्हाला किमान पैशांसोबत क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करणे शक्य होईल. परंतु, तुम्ही कोणतीही क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) निवडली तरी चढउतार होण्यासाठी सज्ज राहा आणि बाजारावर नीट लक्ष ठेवा.

हे हि वाचा –

Cryptocurrency Price : मोठ्या घसरणीनंतर आज तेजी, Shiba Inu झाली सर्वात मोठी वाढ

Cryptocurrency Price: 2 दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झाली वाढ