हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यास सुरुवात झाली असून प्रवाश्यांना नवीन सोयीसुविधासह हे स्थानक मिळणार आहे. CSMT स्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या प्रवश्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून तब्ब्ल 2 हजार 400 कोटींचा निधी दिला आहे.
RLDA द्वारे केला जातोय पुनर्विकास-
या स्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी तब्ब्ल 2 हजार 400 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच RLDA द्वारे काम केले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे. सध्या येथे नवे DRM कार्यालयाचा पाया खणण्याचे 75 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानकाच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेअंती अहलुवालिया यांची निवड झाली आहे.
एकूण 4,61,534 क्षेत्रफळाचे होणार बांधकाम –
CSMT चे एकूण क्षेत्रफळ 4,61,534 चौ.मी. एवढे आहे. त्यामध्ये नवीन बांधकाम क्षेत्र हे 2,79,507 चौ. मी. इतके आहे. तर नूतनीकरणासाठी निश्चित क्षेत्र हे 1,30,912 चौ. मी. आहे. तसेच टर्मिनसलगत मुक्त परिसर – 37,703 चौ. मी. एवढा आहे. तर इतर आवश्यक बांधकामासाठी – 13,412 चौ. मी. एवढे क्षेत्रफळ आहे.
कोणते होणार कामे?
CSMT चे ड्रोन-रडार-हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच स्थलांतरित करणऱ्या ऍनेक्स इमारत, पार्सल इमारत, ट्रॅफिक इमारत यांच्या तपशिलाचे संकलन पूर्ण झाले असून फलाट क्रमांक 18 वर कार्यालय देखील तयार झाले आहे. ही कामे येथे पूर्ण झाली असून CSMT स्थानकावर वस्तू विक्रीसाठी इमारती तसेच पार्सल इमारती उभारल्या जाणार आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेस आणि लोकलला जोडणारा डेक निर्माण केला जाईल. त्याचप्रमाणे पादचारी पूल, स्कायवॉक हे निर्माण केले जातील.
वारसा इमारतीच्या परिसरात मोकळ्या जागेची निर्मिती केली जाईल. तसेच छताचे नुतनीकरण, दुमजली प्रवासी विश्रामगृह आणि संरक्षक भिंत देखील उभारल्या जातील. या नूतनीकरणामुळे CSMT चा मोठा कायापालट होणार आहे हे नक्की. CSMT बरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार आहे. असे केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवेंनी सांगितले आहे.