सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक 2022 निवडणुक वाई नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग रचना आराखडा व लोकसंख्येनुसार सोडत आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यात आल्या. या प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले असून रंगतदार लढती होणार आहेत.
वाई शहरातील पूर्वीच्या 10 प्रभागा मध्ये एका प्रभाग रचनेची वाढ झाल्यामुळे आता 11 प्रभाग तयार झाले आहेत. 10 प्रभागात प्रत्येकी 2 संख्या तर 11 प्रभागात लोकसंख्ये आधारे 3 सभासद संख्या झाली असल्याने या निवडणुकीत एकूण 23 सभासदांना निवडणूक संधी प्राप्त होणार आहे. 23 सभासद संख्येपैकी अनुसूचित जाती 2, अनुसुचित जमाती 1, अनुसूचित जात व जमाती महिला प्रत्येकी 1 तर सर्वसाधार महिला 11 व उर्वरित 8 खुल्या जागां वर सर्वसाधारण उमेदवारांना निवडणूकीची संधी मिळणार आहे. सरासरी 3000 लोकसंख्येच्या आधारावर 10 प्रभाग रचना करणेत आल्या आहेत. नवीन वाढलेला प्रभाग क्र 11 ची 4000 लोकसंख्या असल्याने यंदा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूकि त सोनगीरवाडीमध्ये 1 प्रभाग जादा वाढला आहे. त्यामुळे 3 नवीन सभासदांना नव्याने संधी उपलब्ध झाली आहे.
प्रभागानुसार आरक्षण- प्रभाग क्रमांक 1- 1अ सर्वसाधारण महिला,1 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 2- 2अ सर्वसाधारण महिला,2ब सर्वसाधारण,प्रभाग क्र 3- 3अ अनुसूचित जाती महिला,3 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 4- 4अ अनुसूचित जाती सर्वसाधारण,4 ब सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र 5- 5अ सर्वसाधार ण महिला, 5 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 6- 6 अ सर्वसाधारण महिला, 6 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 7- 7 अ सर्वसाधारण महिला, 7 ब सर्वसाधारण
प्रभाग क्र 8- 8 अ सर्वसाधारण महिला, 8 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 9- 9 अअनुसूचित जाती महिला, 9 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 10- 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण, प्रभाग क्र 11- 11अ सर्वसाधारण महिला,11 ब सर्वसाधारण महिला, 11क सर्वसाधारण याप्रमाणे
12 महिला व 11 पुरुषांना निवडणूक संधी प्राप्त झाली आहे.
प्रभाग 1,2,5,6,7,8,10 व 11 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशी संधी प्राप्त झाली आहे. विरोधी पक्ष नेते सतीश वैराट व नगरसेवक संग्राम(पप्पू) पवार यांचा हक्काचा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. तर नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या सह नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, महेंद्र धनवे, भारत खामकर यांचे मतदार सुरक्षित राहिल्याने पुन्हा संधी मिळाली आहे. तर अन्य प्रभागात अनेक नवीन चेहऱ्याना संधी मिळणार आहे.