हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा दादर स्टेशनवरून (Dadar Railway Station) ये- जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या स्टेशनवर गर्दी दिसून येते. आता ही गर्दी कमी करण्यासाठी दादर स्टेशनच्या फलाटाचा (प्लॅटफॉर्मचा) विस्तार करण्याचे मध्य रेल्वेने निर्णय घेतला होता. आता हे काम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. आता हा बदल नेमका कसा असणार आहे याबाबत जाणून घेऊयात.
9 डिसेंबरपासून होणार अंमलबजावणी
दादर म्हणजे मुंबईतील सर्वाधिक गर्दी असणारे स्थानक आहे. त्यामुळे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीही प्रवाश्यांना गर्दीचा सामना करावा लागतो. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्लॅटफॉर्म गाठताना अनेकदा प्रवाश्यांचा गोंधळ उडतो. त्याच मुख्य कारण म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्मचे क्रमांक हे एक ने सुरु होतात. मात्र आता 9 तारखेपासून या स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. येथील प्लँटफॉर्मला 1 ते 15 असे क्रमांक दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा होणार आहे.
कसा असेल नवीन बदल?
दादर स्थानकात होणाऱ्या फलाट क्रमांकाच्या बदलास समोर ठेऊन पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मपासून सुरु झालेला क्रमांक हा मध्य रेल्वेच्या शेवटच्या प्लॅटफॉर्मपर्यंत कायम असणार आहे. पहिले 1-8 असे असलेले प्लॅटफॉर्म आता 8-14 क्रमांकांनी ओळखले जातील. त्यामुळे प्रवासी नवीन असो वा जुना त्याचा गोंधळ उडला जाणार नाही. तसेच जो प्लॅटफॉर्म 1 असा होता तो आता 8 म्हणून ओळखला जाणार आहे. 9 डिसेंबरपासून हे नवीन बदल स्थानकात लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार स्टेशनमध्ये तयारीही सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.