बीड | आईवडिलांना सततची मारहाण, हाणामारी, वादावादी आणि विचित्र वागणुकीमुळे मेहुण्याने दोन मित्रांची मदत घेऊन तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी बीड जिल्हयातील नेकनूर येथे घडली. मांजरसुबा घाटाजवळ मृतदेह दुचाकीवर आडवा आढळल्याने परीसरात खळबळ उडाली होती.
निलेश ढास (वय 25) रा. निंबागणेश ता. बीड असे मृत तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या ठिकाणी दुसऱ्या पत्नीसोबत तो राहत होता. तो आई वडिलांचा लाडका होता. मात्र वाईट संगतीमुळे तो मनमानी पद्धतीने वागत असे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर बलात्कार आणि बाललैगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर त्याने या प्रकरणातील पीडितेसोबत लग्न करून पुन्हा नवीन लग्न केले होते. त्याचबरोबर आई वडिलांना देखील तो सतत मारहाण करत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून ते पुण्याला राहायला गेले होते. याबरोबरच रोजच्या वागण्याला कंटाळून मेहुणा मनोज घोडके याने निलेशला समजवायचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्याच्या वागण्यात सुधारणा न झाल्यामुळे त्याने नीलेशची हत्या केली.
सोमवारी सायंकाळी बिड येथील बार्शी नाका परिसरात पहिल्या पत्नीला भेटून लिंबागणेशला जायला निघाला परंतु रस्त्यातच मेहुना मनोज याने त्याच्या मित्रासोबत लोखंडी रॉडने मारून निलेशचा खून केला. नेकनूर पोलिसांनी 24 तासात तपास लावून खुणाचा उलगडा केला. हाती आलेल्या माहितीनुसार मेहुणा मनोज घोडके (वय 30), राजाभाऊ यादव (वय 21), कृष्णा डाके या तिघांनी मिळून निलेशची हत्या केली. या तिघांना बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन जुलै पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.