कराड प्रतिनिधी | रतय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, विश्वस्त व चेअरमन दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांची आज 120 वी जयंती आहे. यानिमित्ताने मुकादम तात्या यांच्या जयंतिनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या जन्मगावी कुसुर येथे जंयती सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शिक्षण पोहोचवण्यात तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडनेत तात्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
यंदाचा ४० वा मुकादम साहित्य पुरस्कार डाॅ. आर. ए. कुंभार यांच्या कुशल प्रशासक या पुस्तकास जाहीर झालाय. तर यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री नामदेव जाधव यांना जाहीर करण्यात आला. तसेच चैतन्य पुरस्कार मेघमाला घाडगे यांना देण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य मोहनराव राजमाने तर प्रमुख पाहुणे म्हणुन रयतचे सचिव डाॅ. शिवणकर उपस्थित होते.
दरम्यान, स्वत:ची शेकडो एक्कर जमिन दान करुन मुकादम तात्या यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संकल्पनेतील कमवा व शिका योजनेला बळकटी दिली. तसेच अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना स्वत:च्या खिशातील पैसे घालून जमिनी घेऊन दिल्या. तेही कोणतीही अपेक्षा न करता. कराड येथील प्रसिद्द स.गा.म. महाविद्यालयाची स्थापनाही मुकादम तात्या यांनी करुन कराड तालुक्यातील शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली. दानशुर बंडो गोपाळा कदम यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जाण्यानंयर संस्थेची धुरा सांभाळली. रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणेत मुकादम तात्यांचे मोलाचे योगदान राहिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’