हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एमसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे
शासनमान्य शाळांमधून 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी तसेच आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in आणि https://msecpuppss.in: संकेतस्थळावर 1 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हंटल.
ऑनलाईन अर्ज कुठं करायचा?
पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना www.msecpune.in आणि https://msecpuppss.in या वेबसाईटवर अर्ज करण्याच आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे.