गडचिरोली हादरलं! प्रेमासाठी मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आईची केली हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली जिल्ह्यात आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या (Murder) केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या ठिकाणी घटना घडली आहे. आईकडून तिला सतत होणारी रोकटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या (Murder) केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अहेरी येथील निर्मला आत्राम हिचे पती पोलीस दलात असताना वीस वर्षांपूर्वी माओवाद्यांनी त्यांची हत्या (Murder) केली होती. यानंतर निर्मला यांनी स्वतःच्या मुलीसह अहेरी येथे राहून घरकाम करून स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह केला. आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी उर्मिलाला एका तरुणासोबत संशयास्पद अवस्थेत फिरताना पाहिले. यावेळी तिने आईचा मृत्यू (Murder) झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं तर घरात निर्मला या मृतावस्थेत दिसल्या.

पोलिसांना उर्मिलावर संशय आला त्यानंतर त्यांनी तिची कसून चौकशी केली असता उर्मिलाने आपल्या प्रियकर रुपेश येनगंदलवारला सोबत घेऊन आईची गळा दाबून हत्या (Murder) केल्याचं कबुल केलं. मृत आई निर्मला आत्राम यांना उर्मिलाचे बिनधास्त वागणे खटकत होतं. त्यामुळे त्या उर्मिलाला सातत्याने टोकायच्या. हे उर्मिलाला अजिबात आवडत नव्हते. म्हणून तिने प्रियकर रुपेश येनगंदलवार याच्या मदतीने आईची गळा दाबून हत्या (Murder) केली. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!