अकोला प्रतिनिधी। संपत्तीच्या वादातून मुलीनेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. बाबुराव कंकाल असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रेश्मा बाविस्कर असे मृत बाबुराव यांच्या मुलीचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबूराव शहरातील खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे राहत होते. संपत्तीच्या वाटणीवरून रेश्मा आणि तिचे वडील बाबुराव यांच्यात वाद होता. या वादाचे पर्यवसान काल जीवघेण्या हल्ल्यात झाले. बाबुराव यांच्यावर त्यांची विवाहित मुलगी रेश्माने संतापाच्या भरात चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात बाबूराव गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत सर्वोचार रुग्णालयात दाखल केले. मात्र,रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबुराव यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता पोलिसांनी घटनेतील आरोपी रेश्मा बाविस्करला अटक केली आहे.
इतर काही बातम्या-
अहमदनगर मध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक नदीत आढळले
वाचा सविस्तर – https://t.co/GIx1AHch9T@bjp4ahemadnager @DGPMaharashtra @PuneCityPolice #crimeandpunishment #crimenews
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
मोदींनी ममल्लापुरम समुद्रकिनारी स्वच्छता करत दिला स्वच्छतेचा संदेश
वाचा सविस्तर – https://t.co/lviy6CCdyQ@PMOIndia @narendramodi_in @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4India @swachhbharat #SwachhBharat #ModixijinpingMeet
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध
वाचा सविस्तर – https://t.co/LtzEvJH5qy@NiteshNRane @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #vidhansabha2019#MaharashtraAssemblyPolls
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019