मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि रन मशीन विराट कोहली (Virat kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. या आयपीएल सिझनमध्येसुद्दा त्याला रना करण्यासाठी झगडावे लागत आहे. त्याला आतापर्यंत या सीझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आलं आहे. त्याच्या या फॉर्ममुळे त्याला दिग्गज क्रिकेटपटूंनी सल्ले दिले आहेत. काहींनी त्याला बॅटींगमधील तंत्र बदलण्याचा सल्ला दिला आहे. तर विराटनं (Virat kohli) क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा असं काही माजी क्रिकेटपटूंनी त्याला सल्ला दिला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू डेव्हिड वॉर्नरने मात्र त्याला जरा हटके सल्ला दिला आहे.
डेव्हिड वॉर्नरने काय दिला सल्ला ?
डेव्हिड वॉर्नरला जेव्हा विराटच्या (Virat kohli) खराब फॉर्मबद्दल सल्ला विचारण्यात आला तेव्हा त्याने क्रिकेटमध्ये फॉर्म शाश्वत नसतो. त्यानं वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचा आनंद घ्यावा आणि दोन आणखी मुलांना जन्म द्यावा असा हटके सल्ला दिला.
काय म्हणाला वॉर्नर ?
‘दोन आणखी मुलांना जन्म दे आणि त्यांच्या प्रेमाचा आनंद घे. फॉर्म हा तात्पुरता असला तरी क्लास कायम असतो. हे जगातील प्रत्येक खेळाडूच्या बाबतीमध्ये घडते. तुम्ही किती चांगले खेळाडू आहात याचा याबाबत काही फरक पडत नाही. प्रत्येकालाच चढ-उताराचा सामना करावा लागतो.’ असे डेव्हिड वॉर्नर म्हणाला.
हे पण वाचा
वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच; तारीख, वेळ आणि सुतक कालावधी जाणून घ्या
15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल
वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार