अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक; NCBची मोठी कारवाई

Iqbal Kaskar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एनसीबीने मुंबईमध्ये मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते.यानंतर त्यांनी कारवाई करत इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशी झाल्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करुन ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. या कारवाईदरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले. आणि त्याच पुराव्यांच्या आधारे ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या लक्षात आले.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपये असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.