हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाच्या निवडणूकीत पहिला कल हाती येत असून जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.
दरम्यान काले- कार्वे गट क्र. 2 मध्ये काल्याचे दयानंद भीमराव पाटील हे सहकार पॅनल कडून निवडणूकिच्या रिंगणात असून तब्बल 5 हजारोंहुन अधिक मतांनी आघाडीवर असून भाऊ आघाडी वर असून दयाभाऊंना पहिल्या फेरीअखेर तब्बल 10074 मते मिळाली आहेत. कृष्णा हॉस्पिटल येथे दयाभाऊंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष सुरू असून गुलालाची उधळण चालू आहे.
कोण आहेत दयानंद पाटील –
दयानंद पाटील हे मूळचे काले या गावातील असून जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत. दांडगा जनसंपर्क, लोकांप्रती आपलेपणा, अडचणीच्या वेळी धावून जाण्याची वृत्ती यामुळे दयानंद पाटील प्रसिद्ध आहेत. काले गावात त्यांचा करिष्मा जोरात असून कृष्णा कारखाना निवडणूकीत ते आत्तापर्यंत तब्बल 4 वेळा संचालक म्हणून निवडणूक आले आहेत. भाजप नेते अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या दयाभाऊंनी कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन हे पदही अतिशय चांगल्या प्रकारे भूषवले आहे