राज ठाकरेंना मिळाली नवी उपाधी; ‘तो’ बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदी वरील भोंग्या बाबतच्या विधानाने राज्यात वातावरण तापलं असतानाच आता हनुमान जयंती निमित्ताने राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून पुण्यात त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पुण्यात राज ठाकरे यांच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा केला आहे.

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. यावेळी सामूहिक हनुमान पठणही केलं जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणजे मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांना आता ‘हिंदुजननायक’ राज ठाकरे अशी नवी उपाधी देण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी राज ठाकरे यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख असलेला एक बॅनर मुंबईतील घाटकोपर भागात झळकला होता. तेव्हा हिंदूहृदयसम्राट हे फक्त एकच आहेत अस म्हणत पुन्हा असे काही करू नको अशी विनंती राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केली होती. त्यानंतर आता पुण्यात राज ठाकरे यांच्या बॅनरवर हिंदू जननायक असा उल्लेख पाहायला मिळत आहे

Leave a Comment