हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे देखील राज्याचे चार वर्षे मुख्यमंत्री होते. टीका करणे फार सोपे असते. जे कोणी टीका करत आहेत ते कधीना कधी राज्याचे प्रमुख होते. एकमेकावर टोलवाटोलवी करून चालणार नाही. सरकार व विरोधीपक्ष असणाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आज जे पुढारपण करतायत तसेच विरोधीपक्ष म्हणून जाऊन भेटतायत. त्यातील प्रत्येकजनाने महत्वाचे पद उपभोगले आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगावला.
आज जे पुढारपण करतायत त्यांनी एकेकाळी…; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पृथ्वीराजबाबांना टोला pic.twitter.com/cP9SIn6lVg
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 10, 2023
कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,सरकार व विरोधीपक्ष असणाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. काहीजण म्हणतात केंद्रात सत्ता आहे. १० वर्षे डॉ. मनमोहन सिंग हेही सत्तेवर होते ना? मी काही तरी बोलायचं आणि त्यांनी काही तरी बोलायचं. असे चालणार नाही.
बहुजन समाजाला खर्या अर्थाने न्याय देण्याकरिता सत्तेचा वापर केला पाहिजे, ही जी स्व. यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आहे. त्यांचे कार्य आम्ही पाहत आलेलो आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.