परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे,
जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील टाकीमधून आल्याचा प्रकार मंगळवार 7 मे रोजी नागरिकांचा निदर्शनास आला.
जिंतूर शहराला येलदरी धरणा मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या शिवडी शिवारामध्ये सदरील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते .
दरम्यान मंगळवारी सकाळी अण्णाभाऊ साठे चौकातील पाणीपुरवठ्याच्या टाकीमधून येलदरी रस्ता ,बौद्ध नगर, पुंगळवेस, पोलीस वसाहत, चपराशी वसाहत व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या नळांना अत्यंत दूषित ,दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा करण्यात आला यामध्ये मृत प्राण्यांचे अवयव तुकडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली दूषित पाण्यामुळे जिंतूर मधील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आधिच अधून मधून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालल्याची भावना झाली आहे.