संतापजनक! स्वतःच्याच भाचीचा एका रात्रीसाठी साडेचार लाखांत केला सौदा

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसई : हॅलो महाराष्ट्र – एका महिलेने आपल्या 16 वर्षांच्या सख्ख्या भाचीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड याठिकाणी घडली आहे. या आरोपी महिलेने एका रात्रीसाठी आपल्या भाचीचा साडे चार लाखांमध्ये सौदा केला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सौदा फसला आहे. पोलिसांनी सापळा रचून या महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या दरम्यान पोलिसांनी 16 वर्षीय पीडित मुलीची सुखरुप सुटका केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मीरा रोड येथील 37 वर्षीय महिला एका 16 वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायासाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती बेकायदेशीर मानवी तस्करी शाखेला मिळाली होती. या महिलेने एका रात्रीसाठी पीडित मुलीचा साडे चार लाख रुपयांना सौदा केला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत एका स्वयंसेवी महिलेच्या मदतीने आरोपी महिलेशी संपर्क साधला आणि पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले.

मुंबई-अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये हा व्यवहार ठरला. ठरलेल्या व्यवहारानुसार आरोपी महिला अल्पवयीन मुलीला ठरलेल्या ठिकाणी घेऊन आली. पण त्या ठिकाणी पोलिसांनी आधीपासून सापळा रचून ठेवला होता. जेव्हा हि महिला त्या ठिकाणी आली तेव्हा पोलिसांनी या महिलेला रंगेहाथ पकडून तिला अटक केली. तसेच पोलिसांनी पीडित मुलीची सुटका देखील केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिला पूर्वाश्रमीची बारबाला असल्याची माहिती समोर आली. तसेच पीडित मुलगी हि आरोपी महिलेची सख्खी भाची असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.