हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे ९१व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण कोरोनाचे संक्रमण असल्याची माहिती आहे. मिल्खा सिंग यांच्या जाण्याने संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे शोक व्यक्त करत मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
मिल्खा सिंग यांच्या जीवनपटावर २०१३ साली भाग मिल्खा भाग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो अत्यंत गाजलाही होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने त्यांची भूमिका निभावत त्यांचे आयुष्य रिल लाईफमध्ये खऱ्या अर्थाने जगले होते. यामुळे फरहानची त्यांच्यासोबत वेगळीच जवळीक होती. मात्र आता मिल्खा सिंग याच्या निधनामुळे त्यालाही धक्का बसला आहे व त्याने शोक व्यक्त करत पत्राप्रमाणे एक भावुक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे.
❤️🙏🏽 pic.twitter.com/Ti2I457epP
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) June 19, 2021
या ट्विटर पोस्टमध्ये फरहानने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे कि,
प्रिय मिल्खा जी, माझ्या मनाचा एक भाग अद्यापही हे स्वीकारण्यास नकार देत आहे कि आपण यापुढे आमच्यात नसणार आहेत. तुम्ही आता नाहीत. कदाचित हीच ती हट्टी बाजू आहे जी मला तुमच्याकडून वारसा मिळालेली आहे..
https://www.instagram.com/p/B5FIE2Nh0BL/?utm_source=ig_web_copy_link
जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित होते तेव्हा कधीही हार मानू नका. आणि सत्य हे आहे की, आपण नेहमीच आमच्यात जिवंत राहाल. कारण आपण या पृथ्वीवरील अन्य इतर कोणत्याही माणसापेक्षा अधिक दिलदार मनाचे, प्रेमळ आणि मायाळू व्यक्तिमत्व आहेत.
https://www.instagram.com/p/CQSM6Hkh2Ug/?utm_source=ig_web_copy_link
तुम्ही नेहमीच एका स्वप्नाचे एका कल्पनेचे वास्तविक प्रतिनिधित्व केले आहे. (आपले स्वतःचे शब्द वापरण्यासाठी) किती कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि दृढनिश्चयामुळे एखादी व्यक्ती गुडघे टेकून आकाशास स्पर्श करू शकते हे तुम्ही दाखविलात. तूम्ही आमच्या सर्वांच्याच आयुष्यांना स्पर्श केला आहे. जे लोक तुम्हाला एक पिता आणि एक मित्र म्हणून ओळखत होते, त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे एक आशीर्वाद होतात. तुम्ही म्हणजे एक सतत तेवणारा प्रेरणा स्त्रोत आणि यशस्वीतेमधील नम्रतेची आठवण आहेत. मी नेहमीच तुमच्यावर मनापासून प्रेम करत राहीन.