व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बिबिशन मंजे रावणाचा बाऊ..; प्रियदर्शन जाधवची भन्नाट पोस्ट पाहून नेटकरी दमले हसून हसून

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर वायरल फोटो आणि व्हिडीओज प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. कधी एखादा आगळा वेगळा आणि हटके कॅप्शन असलेला फोटो शेअर केला जातो. नाहीतर कधी जगावेगळा कारभार असणारा एखादा व्हिडीओ शेअर केला जातो. जर का ह्या पोस्ट पाहून नेटकरी हसले तर समजून जा तुम्ही फेमस होणारच. असाच एक भन्नाट फोटो मराठी अभिनेता व दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर नुसता हास्यकल्लोळ उठला आहे.

प्रियदर्शन जाधव याने शेअर केलेल्या फोटोत एक पान शॉप दिसत आहे. दिसताना साधं सुध दिसणार हे पान शॉप मात्र जबरदस्त आणि अनोख्या नावाचे असल्याचे दिसत आहे. आता याच नाव तुम्ही फोटोत पाहिलाच असाल. बिबिशन पान शॉप. आहे का नाही हटके आणि अनोखे. मात्र याहीपेक्षा जास्त वेगळेपण आहे ते खालील वाक्यामध्ये. बिबिशन मंजे रावणाचा बाऊ, अर्थात सांगायचं असं आहे की बिभीषण म्हणजे रावणाचा भाऊ. या पान शॉपचे नाव आणि त्यात हे वाक्य म्हणजे नेटकऱ्यांची मज्जाच झाली. हा फोटो प्रियदर्शनने शेअर केल्यानंतर इतका वायरल होतो आहे कि बस्स. इतकेच नव्हे तर अनेकजण यावर कमेंटही करीत आहेत. यात प्रामुख्याने मराठी कलाकारांचा समावेश आहे.

या फोटो मीमवर कमेंट करताना अभिनेत्री स्मिता गोंदकरने लिहिले कि, तुला हे कुठे मिळालं यार? यावर प्रियदर्शन म्हणतो कि काही मी स्वतः क्लीक करतो तर काही शेअर होऊन येतात. तर अभिनेत्री क्षिती जोग म्हणतेय कि, दर्शन हे तू बनवतोस ना खरं सांग. तर यावर प्रियदर्शनने रिप्लायमध्ये लिहिले, नाही ग…माझ्यात इतकी प्रतिभा नाही. शिवाय अभिनेत्री व सूत्रसंचालिका स्पृहा जोशीने लिहिले कि त्याला लहानपणी बाऊ झाला. अश्या अनेक मजेशीर कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त पल्लवी पाटील, सुयश टिळक, प्रसाद ओक यांनीही या फोटोवर कमेंट केल्या आहेत.