व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३४ टक्के असलेला महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे. मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे महागाई भत्ता वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला विचारात घेऊनच राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. परंतु हा भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच या भत्त्यात वाढ करण्याची हवी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. आता याच मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

दरम्यान, मधल्या काळात राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी भत्ता वाढीसह अनेक मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकारकडून देखील कर्मचाऱयांना अनेक दिलासे देण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकार परिवहन मंडळाकडे लक्ष देत नाही अशी टीका करण्यात येत होती. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे.