पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; 20 स्लीपर सेल्स सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. NIA च्या मुंबई ब्रांच ला हा धमकीचा मेल आला आहे. टीव्ही ९ भारतवर्ष’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 20 किलो RDX ने मोदींवर हल्ला करणार असल्याचे मेल मध्ये म्हंटल आहे. सदर मेल करणाऱ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल सज्ज आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना २० किलो आरडीएक्सने मारण्याचा कट रचला जात होता. सुरक्षा एजन्सी माहिती गोळा करत आहेत की पीएम मोदींच्या हत्येचा कट रचल्याबद्दल आलेल्या ई-मेलचा स्रोत काय आहे?

राष्ट्रीय तपास संस्थेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. सध्या देशातील तपास यंत्रणांकडून या ई-मेलसंदर्भात तपास सुरु आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव उघड केलेले नाही. परंतु, आरडीएक्सच्या साहाय्याने स्फोट घडवून पंतप्रधान मोदींना घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment