योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Yogi Adityanath
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लखनौच्या आलमबागमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी सापडलेल्या बॅगेतून धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये सीएम योगींना बॉम्बने उडवण्याचे म्हटले आहे. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात एनसीआर (नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट) दाखल केला.

हाती आलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या आलमबाग भागात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून सापडलेल्या बॅगेत हे धमकीचे पत्र मिळाले आहे; देवेंद्र तिवारी असे त्यांचे नाव आहे. धमकीच्या पत्रात सीएम योगी आणि देवेंद्र तिवारी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात जनहित याचिका दाखल केल्याने मुस्लिमांच्या पोटावर लाथ मारली आहे. तसेच तुम्ही लोकांनी ओवेसी आणि मौलाना मदनी यांना रडवले आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या अश्रूंचा बदला घेऊ, असा इशारा धमकीच्या पत्रातून दिला आहे . या पत्रानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पोलीस, सायबर आणि सर्व्हिलन्स सेलच्या टीमने याबाबतचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, देवेंद्र तिवारी हे मूळचे लखनौचे असले तरी सध्या ते अयोध्येत आहेत. लवकरच तुमच्यावर (देवेंद्र तिवारी) आणि सीएम योगी यांना बॉम्ब ने उडवण्यात येईल असे या पत्रात म्हटले आहे. देवेंद्र तिवारी यांनी संपूर्ण राज्यात अवैध कत्तलखान्यांविरोधात आवाज उठवला. याशिवाय या कत्तलखान्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचे कामही ते करत असतात.