1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटची पद्धत बदलणार, आता SMS शिवाय पैसे कापले जाणार नाहीत; RBI ‘हे’ नियम लागू करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता किंवा बिलाचे पैसे (EMI Installment) कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. त्यांना त्यांच्या सिस्टीममध्ये असे बदल करावे लागतील की एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ नयेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यापूर्वीच म्हटले होते की,” डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) वापरून वारंवार होणारे व्यवहार अतिरिक्त घटक प्रमाणीकरण (AFA) आवश्यक असतील.

ऑटो डेबिट सिस्टीम म्हणजे काय?
ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल एप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, गॅस, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ठेवले असतील तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. जर ऑटो डेबिटचा नियम लागू केला गेला तर तुमच्या बिल भरण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुमचा एक्टिव्ह मोबाईल नंबर बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे. कारण ऑटो डेबिटशी संबंधित नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल नंबर वरच SMS द्वारे पाठवली जाईल.

पहिले SMS पाठविला जाईल
नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर बँकांना पेमेंट देय तारखेच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवावी लागेल. पेमेंटच्या 24 तास आधी रिमाइंडर पाठवावे लागेल. या रिमाइंडरमध्ये पेमेंटची तारीख आणि पेमेंटची रक्कम इत्यादींची माहिती असेल. ऑप्ट आउट किंवा पार्ट-पेचा पर्याय देखील असेल. हा नियम 30 सप्टेंबर नंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. याशिवाय 5000 पेक्षा जास्त पैसे भरल्यावर OTP सिस्टीम अनिवार्य करण्यात आली आहे.

बँकिंग फसवणूक थांबवणे हा उद्देश आहे
RBI ने बँकिंग फसवणूक आणि ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सध्याच्या सिस्टीम नुसार, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म किंवा बँका ग्राहकांकडून परवानगी घेतल्यानंतर कोणतीही माहिती न देता दर महिन्याला ग्राहकांच्या खात्यातून कट करतात. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. हा बदल फक्त ही समस्या दूर करण्यासाठी करण्यात आला आहे.

Leave a Comment