किसनवीर कारखान्यावर 1 हजार कोटीचे कर्ज हे साफ खोटे : मदन भोसले

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी

साडेआठशे आणि हजार यांचा मध्य काढा त्याच्यापेक्षा एक रूपया जास्ती गेला तर मदन भोसले कारखान्यांच्या कारभारातून नव्हे तर सार्वजनिक जीवनात सुध्दा एकही दिवस राहणार नाही. किसनवीर सहकारी साखर कारखान्यांवर 1 हजार कोटीचे कर्ज असल्याचे साफ खोटे असल्याचे कारखान्यांचे चेअरमन मदनराव भोसले यांनी सांगितले.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांच्या वर्तनावरून शेतकऱ्यांच्याबाबत कोणतेही प्रेम नाही केवळ मदन भोसले तेथे गुंतून पडण्यासाठी हा खटाटोप आहे. या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल. कारखान्यांच्या निवडणुकीत चुकीचे सांगणारा जागाही दाखविली जाईल, असे मदन भोसले म्हणाले.

मदन भोसले म्हणाले, मी स्वतः माझ्या कामात व्यस्त असतो. समाजात रोज कोण तरी माझ्याबाबत बोलत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मला वेळ नसतो. मात्र त्याचा अतिरेक व्हायला लागला आहे. माझ्यावरील रागापोटी संस्थेवर अविश्वास निर्माण व्हावा असे होवू लागल्याने मी वस्तुस्थिती लोकांना सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे.