हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डेक्कन ची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेल्वेला पुणे मुंबई प्रवास करत 93 वर्षे पूर्ण झाली आहे. 1 जून 1993 मध्ये ही डेक्कन क्वीन पटरीवर उतरली होती. 16 डब्यांची ही रेल्वे गाडी आता पर्यंतच्या प्रवासात परसाचा दगड बनली आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही. 93 वर्षाच्या या इतिहासात या ट्रेनने मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडले. त्यामुळे या खास दिवशी डेक्कन क्वीनला फुलांनी आणि रांगोळी ने सजवन्यात आलं आणि प्लॅटफॉर्म वर गाणे लावून तिचे स्वागत करण्यात आले.
या ट्रेनचं नाव डेक्कन क्वीन का पडलं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. हे नाव ती जोडत असलेल्या दोन शहरांवरून आणि खास करून पुण्यावरून पडले. त्यामुळेच तिला दक्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन असं म्हंटल जात. ही ट्रेन पुणे आणि मुंबई ला जोडणारी पहिली ट्रेन आहे. जेव्हा ही ट्रेन सुरु झाली, तेव्हा ती फक्त सात डब्ब्यावर चालत होती. यावेळी दोन ट्रेन होत्या. त्यापैकी एक राखाडी रंगाची तर दुसरी निळ्या रंगाची होती. मुंबई- पुणे सोबतच या ट्रेनला इंग्लंड साठी देखील तयार केले होते. ही ट्रेन सुरु झाली तेव्हा प्रथम आणि द्वितीय श्रेणी हे होते. परंतु 1 जानेवारी 1949 ला प्रथम श्रेणी ला बंद करण्यात आलं. यानंतर 1955 मध्ये तृतीय श्रेणीला जोडण्यात आलं.
तामिळनाडू मध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या स्टील डब्याचे रूपांतर अँटी-टेलिस्कोपिक इंटिग्रल कोचमध्ये करण्यात आले. त्यावेळी डब्ब्याची संख्या सात होती. ती वाढवून 12 करण्यात आली. यामुळे ही ट्रेन जास्त प्रवासी घेऊन जाण्यासाठी सक्षम झाली. अजूनही या ट्रेन मधील डब्ब्यांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरूच असून या ट्रेनला सध्या 16 डब्बे आहेत.