नवी दिल्ली । केंद्र सरकारने 1.5 लाख मेट्रिक टन उडीद डाळ आयात करण्याची अंतिम तारीख 15 दिवसांपर्यंत वाढविली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे भारतातील अनेक राज्यांतील अन्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा परिणाम लक्षात घेऊन ही तारीख वाढविण्यात आली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 30 एप्रिल होती. वाणिज्य मंत्रालयाने 7 मे रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती. भारतात डाळी आणि तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन होते.
याबरोबरच भारत डाळी, तेलबिया यांचा सर्वात मोठा ग्राहक देखील आहे. गेल्या 5-6 वर्षांत भारतातील डाळीचे उत्पादन 140 लाख टनांवरून 240 लाख टनांपेक्षा जास्त झाले आहे. सन 2019-20 मध्ये भारताने 23.15 लाख टन डाळींचे उत्पादन केले, जे संपूर्ण जगाच्या 23.62 टक्के आहे.
गेल्या वर्षी आयात खूप झाली
गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये भारतामध्ये तूर डाळ 38.80 लाख मेट्रिक टन, उडीद डाळ 24.50 लाख मेट्रिक टन, मसूर डाळ 13.50 लाख मेट्रिक टन, मूग डाळी 26.20 लाख मेट्रिक टन आणि हरभरा डाळ 116.20 लाख मेट्रिक टन होती. दुसरीकडे तूर डाळ 4.440 मेट्रिक टन, उडीद डाळ 3.21 मे.टन, मसूर डाळ 11.01 मे.टन, मूग डाळ 0.52 मे.टन आणि हरभरा डाळ 2.91 मे.टन आयात करावी लागली.
डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे
डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, 82.01 कोटी रुपयांच्या 20 लाखाहून अधिक मिनी किटचे वितरण केले जाईल. जेणेकरुन पीक वर्ष 2021-22 (जुलै-जून) च्या खरीप हंगामात डाळीच्या उत्पादनास चालना मिळू शकेल. खरीप (ग्रीष्म ऋतू) हंगामात पेरणी जूनमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून सुरू झाल्यापासून सुरू होते. यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. खरीप पिकांच्या मुख्य डाळींमध्ये तूर, मूग आणि उडीद आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा