हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जल्लत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. “22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना खास पत्र देखील पाठवले आहे.
शतकानूशतके वनवासात राहिलेले प्रभू श्रीराम सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी जन्मभूमी आयोध्यामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. या दिवसाकडे राम भक्तांचे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिली आहे. त्यामुळे सध्या सर्वजण या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी, भातखळकर यांनी केली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत म्हणले आहे की, “अयोध्येतील कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्यादिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी” तसेच, खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत” त्यामुळे आता अतुल भातखळकर यांच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.