हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. देशात रोज ३ लाख नवे रुग्ण आढळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोविड ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. अशा स्थितीत संजय राऊत यांनी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी असे म्हंटले आहे.
याबाबत बोलताना त्यांनी म्हंटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने कोविड १९ ला राष्ट्रीय आपत्ती म्हंटले आहे. कोविड १९ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे सातत्याने करीत आहेत. त्यांनी गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तशी मागणीही केली होती. मात्र त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने तेच म्हटलं आहे, असंही ते म्हणाले.सध्या महाराष्ट्र सरकार सर्वात चांगलं काम करत आहे. काही दिवसांनी देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावं लागेल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशात सर्वात चांगलं काम महाराष्ट्र करत आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र अनेकांनी केलं मात्र ते त्यात अयशस्वी ठरल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच राज्यात लसीकरण मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे. १ मे पासून सर्वाना मोफत लसीकरण करणार असल्याचे राज्याने स्पष्ट केले आहे. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येला लस पुरवणे हे राज्यासाठी आव्हानातम्क आहे. राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
देशातील ताजी कोरोना आकडेवारी
देशात करोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासात देशात तीन लाख 79 हजार 257 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चिंताजनक बाब म्हणजे उच्चांकी 3,645 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून मागील 24 तासात 2 लाख 69 हजार 507 रुग्णांना कोरोनावरील उपचार करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.दरम्यान नव्याने वाढलेल्या रुग्णांवर देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात एक कोटी 50 लाख 86 हजार 878 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत दोन लाख 4 हजार 832 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.