कोरोनावर मात करून अखेर दीपक चहर चेन्नईच्या संघात सामील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL 2020 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आयपीएल च्या सर्वात यशस्वी संघ असलेला चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चहर ने कोरोनावर मात केली आहे. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले होते. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंनाही करोना झाला होता, पण दीपक चहरने करोनावर मात केली आणि अखेर तो CSKच्या सराव सत्रात सहभागी झाला.

BCCIच्या नियमानुसार, अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूला १४ दिवस सक्तीने क्वारंटाइन केलं जातं. त्यानुसार दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड दोघांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. दीपक चहर क्वारंटाइन कालावधी संपवून CSKच्या ताफ्यात सामील झाला. पण गायकवाड मात्र अद्यार १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्येच आहे.

दीपक चहर चेन्नईच्या गोलंदाजी विभागाचा आधारस्तंभ असून चेन्नईला दीपक कडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार हे मात्र नक्की.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment