Wednesday, March 29, 2023

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेत 1.11 लाख रुपयांपर्यंत मिळत आहे रिटर्न, कसे ते जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पंतप्रधान व्यय वंदना योजनेचा कालावधी (PMVVY) 3 वर्षांसाठी वाढविला होता. या मंजुरीनंतर आता पंतप्रधान व्यय वंदना योजनेची (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रधानमंत्री व्यय वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना असून त्या अंतर्गत मासिक पेन्शनचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षांपर्यंत एका निश्चित दराने गॅरेंटेड पेन्शन मिळते.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ भारतीय जीवन विमा महामंडळामार्फत घेता येतो. या योजनेत वार्षिक 7.40 टक्के व्याज मिळते. आतापर्यंत सुमारे 6.28 लाख लोकांनी या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात ज्यांना यासाठी सब्सक्राइब करायचे आहे त्यांना 7.40 टक्के व्याजाचा लाभ देण्यात येईल. आपण या योजनेचा कसा फायदा घेऊ शकता ते जाणून घ्या.

- Advertisement -

कोणासाठी आहे मोदी सरकारची ‘ही’ योजना

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 60 वर्षे असावे. या योजनेत वयाची कमाल मर्यादा नसल्यामुळे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9,250 रुपये आहे. या पेन्शन पेमेंटचा लाभ मासिक, तिमाही, सहामाही वा वार्षिक आधारावर घेता येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदाराला एक अर्ज भरावा लागेल. या फॉर्मसह आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे द्यावी लागतील. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येईल.

 

कर्ज देखील उपलब्ध आहे

या योजनेत, काही प्रकरणांमध्ये अकाली पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीला किंवा त्यांच्या जोडीदारास कोणत्याही गंभीर आजारासाठी ही सुविधा मिळते. मात्र, अशा परिस्थितीत केवळ खरेदी किंमतीचे 98% सरेंडर व्हॅल्यू परत केली जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तीन वर्षानंतर कर्जाची सुविधादेखील आहे. मात्र कर्जाची रक्कम ही खरेदी किंमतीच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”