हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपनेते व मंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. सुरवातीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंवर टीका केली. त्यांच्यानंतर आता राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. नारायण राणेंच्या कारकिर्दीला शिवसेनेपासून सुरुवात झाली आहे. त्यांच्या मंत्रीपदामुळे शिवसेनेला फार मोठा फरक पडणार नाही, असे म्हणत केसरकर यांनी राणेंवर टीका केली आहे.
मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना केसरकर यांनी म्हंटल आहे कि, आज नारायण राणे जे काही आहेत ते शिवसेनेमुळे त्यांच्या राजकारणाची सुरुवात हि शिवसेनेमुळे, ठाकरे कुटुंबियांमुळे झाली आहे. राणेंना जे मिळवायचे होते ते त्यांनी शिवसेना व ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोलल्यामुळे मिळाले आहे. त्यांच्या मंत्री पदामुळे शिवसेनेला फार मोठा काही फरक पडणार नाही.
कोकणासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. राणेंचा ठाकरेसोबत जो वाद आहे. त्यामुळे राणे ठाकरे यांच्या विरोधात बोलत असतात. हि राणेंची उपयुक्त्तता आहे. आता नवीन मंत्रिपद मिळाले असल्यामुळे त्यांनी आपले काम चान्गल्या पद्धतीने करून दाखवावे, असे केसरकर यांनी म्हंटल आहे.