Saturday, March 25, 2023

America : डोनाल्ड ट्रम्प ट्विटर, फेसबुक आणि गुगलविरूद्ध खटला दाखल करणार

- Advertisement -

नवी दिल्ली । अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडिया दिग्गज फेसबुक, ट्विटर आणि गूगलविरूद्ध खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह देशातील दिग्गज फेसबुक, ट्विटर आणि गुगलविरूद्ध खटला दाखल करतील. एवढेच नव्हे तर या कंपन्यांच्या सीईओंवरही आपण दावा दाखल करू अशीही घोषणा त्यांनी केली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की,”या सामूहिक कारवाईत खटला दाखल करण्यासाठी ते महत्त्वाचे व्यक्ती असतील.” या कंपन्यांनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने बंदी घातली असल्याचा त्यांचा दावा आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 6 जानेवारी रोजी कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांच्या गदारोळानंतर ट्विटर आणि फेसबुकने कारवाई करत ट्रम्पची खाती आपापल्या प्लॅटफॉर्मवर सस्पेंड केली.

- Advertisement -

न्यु जर्सीच्या बेडमिंस्टर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही ही बंदी संपुष्टात आणण्याची मागणी करीत आहोत. ही ब्लॅक लिस्ट हटविणे आणि रद्द करण्याची प्रक्रिया थांबविली पाहिजे.” हे दावे अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात माजी राष्ट्रपतींच्या वतीने दाखल करण्यात आले आहेत.

उल्लेखनीय आहे की, 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेत कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर त्यांच्यावर गुगलसह सोशल मीडिया कंपन्यांनी बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या खात्यावरील ट्वीटस आणि पोस्ट्स हिंसा भडकवू शकतात अशी भीती कंपन्यांना होती. याक्षणी ट्रम्प यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उपस्थित नाहीत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group