हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. याबाबत शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जे राजकारणासाठी गुन्हेगारीचा वापर केला जातो. अशा प्रकारचे रक्तरंजित राजकारण या आदी कोकणात कधीच झाले नव्हते. त्याची सुरुवात या लोकांनी केली आहे. त्यामुळे आज कोर्टाने चांगला निकाल दिला आहे, असे केसरकर यांनी म्हंटले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान आज कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नितेश राणेंवर करण्यात आलेले आरोप हे काय राजकीय नाहीत. राणेंची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यावर खंडणी गोळा करणे, गोळीबार करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हे गुन्हे काय राजकीय असू शकत नाहीत.
दरम्यान, नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा रंगला. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना मला कायदा शिकवू नका अशी आक्रमक दिली आहे.