आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. राष्ट्रवादी कडून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरु आहे असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकरांनी हा आरोप केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. . छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर केलं. तसेच राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते अशी उदाहरणे केसरकर यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले. आपला पक्ष मोठा व्हावा, ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. शिवसेनेचं राजकारण नेहमीच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या विरोधात राहिल आहे असंही केसरकर यांनी म्हंटल