व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपला 40 हुन अधिक समर्थक आमदारांसोबत बंड केल्यानंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. अजूनही अनेक आमदार -खासदार शिंदेंच्या गोटात जात आहेत. त्यातच आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोणता झेंडा घेऊ हाती अस म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी घेतली आहे.

यापूर्वीही दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर ट्विट केले होते.  “माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचं नाही लढायचं. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल, असे दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.