चाय, बटर, खारी खाऊ घालणाऱ्या पोलिसांचे नाव खराब केल्यास…; दीपाली सय्यद यांचा नवनीत राणांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली. मुंबई पोलिसांच्या विरोधातील तक्रारीनंतर आता मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. यावरुन शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर ट्विटकरत टीका केली आहे. “मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तू तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी. मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू,” इशारा सय्यद यांनी दिला.

दिपाली सय्यद यांनी आज ट्विट करत नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तु तुझ्या घरी.त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी. मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी .आम्ही तक्रार करून उभ करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी. अमरावतीची भाकरवडी, असा इशारा ट्विटद्वारे सय्यद यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

दिल्लीत संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर बाजू मांडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, आज मी समितीसमोर आपली बाजू मांडली. यावेळी समितीतील अधिकाऱ्यांकडे मी काही लोकांविरोधात तक्रार केली असून त्यांची नावे सांगितली आहे. तसेच माझ्या अटकेची संपूर्ण घटना मी त्याला सांगितली. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्यासह काहींचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष हे खासदारांचे पालक असतात. आमच्या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर कारवाई करावी, असे आवाहन मी त्यांना केले आहे.

Leave a Comment